पैठण तालुक्यातील शेवता येथे सरपंच व उपसरपंच यांची निवड - JDM

JDM


Breaking

Friday, October 7, 2022

पैठण तालुक्यातील शेवता येथे सरपंच व उपसरपंच यांची निवड

पैठण प्रतिनिधी दिपक घटे
शेवता ग्रामपंचायत अंतर्गत आज दि.7 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात आली. 
सरपंचपदी श्रीम.प्रमिला विठ्ठल गरड तर उपसरपंच म्हणून आत्माराम दळे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोनाली विजय किर्जत, अक्षय देशमुख, ताराबाई दळे, मुमताजबी शब्बीर शेख, अरुण किर्जत यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रशासकीय अधिकारी म्हणून तलाठी बनायेत व मंडल अधिकारी वैशाली अशोक बैनवाड यांनी काम पाहिले. 
ग्रामसेविका उज्वला लिंबोरे ह्यादेखील यावेळी उपस्थित होत्या. 
बिडकीन पोलीस कर्मचारी तांगडे साहेब जोरले साहेब यांनी बंदोबस्ताचे काम पाहीले.
तसेच पठाडे मामा, ग्रामपंचायत शिपाई मोहन चाबुकस्वार, पोलीस पाटील दत्तू दळे, रोजगार सेवक विठ्ठल गरड, तंटामुक्ती अध्यक्ष शब्बीर भाई शेख,  तसेच गावकरी उत्तम दादा घटे, नंदू डहारे ,फीरोज शेख
बाबासाहेब घटे, उत्तम दळे, विजय किर्जत, शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय देशमुख, बाबासाहेब डहारे, सलीम शेख, ईश्वर किर्जत, वैभव बोडखे, बाळू घटे, संजय घटे ,प्रकाश भाऊ घटे, साहिल शेख, रंजक भाई शेख, कृष्णा दळे, ज्ञानेश्वर लिंबोरे, अकिल शेख, विष्णू गरड, ज्ञानदेव गरड ,विठ्ठल दळे, नवनाथ घटे, मीठू घटे, जावेद शेख, विष्णू दळे, युनूस शेख, प्रमोद माळी, राहुल देशमुख, ताराचंद गरड,  जानिकनाथ घटे, कृष्णा खरोसे आदींनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत व गुलाल उधळून जल्लोषात स्वागत केले.
यावेळी शेवता व विजयपूर येथील समर्थक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते