मानवत उपसंपादक
इरफान बागवान
इकरा उर्दू सेमी शाळेचे संस्थापक सचिव एम ए रिझवान बागवान यांना शारीरिक शिक्षण विषयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
रिझवान यांनी डॉ.एम.के आताऊल्ला जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध खेळाडूंच्या सहभागावर सरकारच्या क्रीडा धोरणाचा परिणाम एक चिकित्सक अभ्यास या विषयावर शोध केला.
मुप्टा संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनील मगरे ;अध्यक्ष प्राध्यापक डॉ.वाघमारे मुप्टा उर्दू संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ समिउल्ला खान, शेख जमील, मराठवाडा अध्यक्ष आसिफ अली खान, इब्राहिम पटेल, एड. लुकमान बागवान, सिराज अली खान, अब्दुल रहेमान, जमियात उलमा चे राज्य अध्यक्ष हाफीज नदीम सिद्दिकी, जिल्हा अध्यक्ष मौलाना सादिक नदवी यांनी अभिनंदन केले आहे.