पातूर येथील ऐतिहासिक दसरा व नवदुर्गा विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न - JDM

JDM


Breaking

Saturday, October 8, 2022

पातूर येथील ऐतिहासिक दसरा व नवदुर्गा विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचा कडक व तगडा बंदोबस्त 

पातूर प्रतिनिधी
अविनाश पोहरे
पातुर येथील दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऐतिहासिक भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन व्यायाम शाळा आणि दसरा महोत्सव समितीचे वतीने रेणुका माता मंदिर च्या पायथ्याशी दसरा मैदानावर करण्यात आले होते.
यावेळी रावणाचे दहन महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे यांच्या हस्ते करण्यात आले.किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रामलीला कार्यक्रमाचे सादरीकरण केले.या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
श्री रेणुका देवी परिसरातील डॉकूमेंट्री तयार करून संपूर्ण अदभूत व ऐतिहासिक टेकडीचे चित्रण अक्षय गाडगे यांनी फोटोग्राफी फिल्मच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच नवदुर्गा विसर्जन मिरणूक विविध दुर्गा मंडळानी पारंपरिक व  सामाजिक पद्धतीने नियम अटीचे भान ठेऊन वेळेवर विसर्जन केले.यावेळी पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. हरिष गवळी, उपनिरीक्षक मा. हर्षल रत्नपारखी, सहाय्यक पोलीस मीरा सोनोणे, उपनिरीक्षक माजिद पठाण यांचा कडक व चोख बंदोबस्त होता.
तसेच पो. कॉ.अनुप आसटकर, विकास जाधव, मयूर उमाळे, श्रीधर पाटील,भवाने मेजर, एस.आर.पी. एफ. गट नं.अमरावती यांची  यंत्रणा सज्ज होती.तसेच इतर  पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलीसांच्या न्याय हक्क व कुटूंबासाठी झटणारी संघटना असून नेहमीच खांद्याला खांदा लावून बंदोबस्त मध्ये मोलाचे सहकार्य केले.  पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण देणारी एकमेव संघटना आहे. यावर्षी नवरात्री, दसरा उत्सव व नवदुर्गा विसर्जन मिरणूक मध्ये एकही गुन्हा होऊ दिला नाही. 
कायदा व सुव्यवस्थाचे भान ठेऊन नियमाचे व शिस्तीचे पालन करून बंदोबस्त केला.
यामध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन युवक आघाडीचे  जिल्हाध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, अविनाश पोहरे उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी, सहसचिव अविनाश गवई, पवन सुरवाडे, सै. तौसिफ़ करण राठोड, आशिष राठोड, आशुतोष राऊत, कु. कोमल सुरवाडे, कु. सुवर्णा चव्हाण, कु. दिव्या वगरे, कु. कोमल हिवराळे, कु. लक्ष्मी कौलकार, आकाश करवते, रोहन राठोड, उदय गायकवाड,गौरव सरदार आदींनी संपूर्ण नवरात्री उत्सव, दसरा महोत्सव व दुर्गा विसर्जन मिरणूक मध्ये सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे योगदान देऊन संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.