प्रतिनिधी रवींद्र लिंबोरे
नेवासा
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे आदी यावेळी उपस्थित होते.
निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. डिसेंबर अखेरपर्यंत या दोन्ही कालव्याचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सुमारे ८३ गावातील नागरिकांना पाण्याचा लाभ होणार असल्याचे खासदार श्री. लोखंडे यांनी सांगितले.
अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनी बाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी नेवासा तालुक्यातील जैणपुर ,घोगरगाव,बेलपांढरी या गावच्या शिवारातुन कापरी नाल्यामुळे पडीक पडलेल्या जमिनी संदर्भात चर्चा करून संबंधित नाल्यांचे खोलीकरण व रुंदी करण्यासाठी जलसंधारण विभागाला खासदार श्री. लोखंडे यांच्या उपस्थितीत मा.मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला .
सदर बैठकीस जैनपुर सरपंच सुरेश डीके,बेल पांढरी सरपंच साहेबराव गारुळे,तसेच घोगरगाव सरपंच सदाशिव बहिरट , मराठा महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, बापुसाहेब दारकुडे, बाळासाहेब पवार, भगवानराव गंगावणे,झापवाडीचे सरपंच पांडुरंग वाघ व खा.लोखंडे साहेबांचे स्वियं साहाय्यक शिवाजीराव दिशांगत,उपस्थित होते.बैठकी नंतर खा. लोखंडे साहेबांच्या हस्ते मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार करण्यात आला.