श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भोकर येथे नवरात्रोत्सवानिमीत्ताने आयोजीत गाथा पारायण व हरीकिर्तन सोहळ्याची उत्साहात सांगता
तरूणांनी व्यसनाधिन होवून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा अध्यात्मीक कार्यक्रमात, उत्सव सोहळ्यात सहभागी होवून वारकरी सांप्रदायात येणं हि काळाची गरज आहे, कारण भगवंताचे भजन, किर्तन व चिंतन हे आपल्या आत्मउद्धाराचे साधन आहे.
न दिसणारा करोना आपल्याला मृत्यू देव शकतो तर न दिसणारा भगवंत आपल्याला वाचविण्यासाठी का येवू शकत नाही? याचा श्रद्धेने विचार करा.अध्यात्मावर म्हणजेच भगवंतावर श्रद्धेने विश्वास ठेवा, त्याची उपाना करा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भागवताचार्य कु.आरतीताई शिंदे महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भोकर येथे शारदोत्वानिमीत्ताने आयोजीत श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदीर प्रांगणात नवरात्रोत्सवानिमीत्ताने गेल्या सात वर्षापासून येथील नवरात्रोत्सव कमीटीचे वतीने येथे श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती व श्रीक्षेत्र विठ्ठल रूख्मीणी देवस्थानचे विश्वस्त गुरूवर्य महंत भास्करगीरीजी महाराज व श्रीक्षेत्र सरालाबेट येथील महंत रामगीरीजी महाराज यांचे कृपाशिर्वादाने व येथील भागवताचार्य ह.भ.प. कु.आरतीताई शिंदे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या किर्तन महोत्सवा व गाथापारायण सोहळ्यात काल्याचे किर्तन प्रसंगी प्रबोधन करताना त्यांनी सांगीतले. येथे गाथापारायण सोहळ्यात व्यासपिठ चालक म्हणून येथील भागवताचार्य ह.भ.प.संतोषमहाराज पटारे यांनी सेवा केली त्याना विठ्ठल सेवाश्रमाचे मठाधिपती सुदाम महाराज चौधरी यांनी साथ दिली.
यावेळी भागवताचार्य संतोष महाराज पटारे, सुदाम महाराज चौधरी, निवृत्ती महाराज विधाटे, गणेशखिंड देवस्थानचे सचीव बजरंग दरंदले, अशोक कारखाण्याचे माजी संचालक खंडेराव पटारे, जगदंबा युवा प्रतिष्ठिानचे गणेश छल्लारे, ठकसेन खंडागळे, गंगाधर गायकवाड, रामदास शिंदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, ज्ञानेश्वर काळे, मच्छींद्र काळे, आबासाहेब काळे, भास्कर आहेर, सौ. पुनमताई पटारे, सौ. गयाबाई शेळके, कल्पना आसावा व मृणालीनीताई आदि प्रमुख व्यासपिठावर उपस्थीत होते.
भगवंताचे चरीत्र ऐकल्याने आपल्या अंतरंगात भगवंतभक्ती निर्माण होत असते त्याचे उदाहरण म्हणजे केवळ भगवती मातेच्या आशिर्वादामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करणे शक्य झालेली आहे, इतकी अगाध शक्तीची देवता म्हणजेच भगवती माता होय. मणुष्याने कधीही कृतघ्न न आपल्यावर एखाद्याने केलेल्या उपकाराची नेहमी जाणीव ठेवली पाहीजे, प्रत्येकाने आपल्या लकरांसाठी संपत्ती कमविलीच पाहीजे पण त्या बरोबर त्या लेकरांवर संस्कारही तीतकेच गरजेचे आहेत. आपले विचार नेहमी चांगले ठेवा, आजच्या विजया दशमीच्या निमीत्ताने सोन्यासारख्या विचारांची देवाण घेवाण करत उत्सव साजरे झाले पाहीजे असेही यावेळी कु. आरतीताई शिंदे महाराज यांनी सांगीतले.
आजच्या काळात कथा, किर्तन करणारी महाराज मंडळी म्हणजे धर्माची संपत्ती आहे. नवरात्रोत्सवाचे निमीत्ताने संपन्न होत असलेला उत्सव म्हणजे नारी शक्तीचा विजय आहे. गाथा पारायणाचे निमीत्ताने पंचम वेदाचं चिंतन होत असते. असे उत्सव म्हणजेच आध्यात्मीक संस्काराचे केंद्र ठरावे अशी सदीच्छा भागवताचार्य संतोष महाराज पटारे यांनी सांगीतले.
तर साधु, संत व महात्मे हे भगवंताची सेवा करत परमार्थ वाढीचे काम करत असतात यातून परमार्थ वाढावा हिच त्यांची इच्छा असते. अध्यात्मात येवू पाहत असलेल्या भावी पिढीला अध्यात्मीक प्रशिक्षणासाठी यापुढे दर रवीवारी भोकर सबस्टेशनजवळील श्री विठ्ठल सेवाश्रम येथे बालकांसाठी व तरूणांसाठी मोफत अध्यात्मीक प्रशिक्षण वर्ग सुरू करत आहोत याचा पंचक्रोषीतील मुलाबरोबर तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत भोकर गावातील जगदंबामाता ही कल्पतरू आहे तीच्या कृपाशिर्वावादाने पुढील वर्षी 108 वाचकांसह गाथा पारायण करण्याचा संकल्प सुदाम महाराज चौधरी यांनी व्यक्त केला.
भोकर येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रौउत्सव सोहळ्याच्या निमीत्ताने आयोजीत या सोहळ्यात दररोज पहाटे महाआरती, सकाळी ‘गाथा पारायण’, दुपारी श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मीक विकास व बालसंस्कार केंद्रातील महिलांचा ‘दुर्गा सप्तशदी पाठ’, दुपारी तीन वा. महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकारांचे जाहीर हरीकिर्तन, त्यानंतर खिचडी महाप्रसादाचे अन्नदान, सायंकाळी हरीपाठ व महाआरती या प्रमाणे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सांगता सोहळ्यात काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे अन्नदान अशोक कारखाण्याचे माजी संचालक खंडेराव पटारे, लक्ष्मण पटारे, सुनिल पटारे, लहानु ढाले, रतन काळे, वसंत ढाले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष मते यांनी केले तर शेवटी सोसायटीचे उपाध्यक्ष किशोर छल्लारे यांनी आभार प्रदर्शन केले.