शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी - JDM

JDM


Breaking

Saturday, October 15, 2022

शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यात 10 सप्टेंबर व 11 सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व त्यानंतरही सततच्या परतीच्या पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सुनगाव रसलपुर निमखेडी कुवरदेव उसरा बुद्रुक उसरा खुर्द, चालठाणा खुर्द चालठाणा बुद्रुक, कुहुपट्टा, वावडी हरदो, गोराळा कौलखेड, तरोडा, खेललोन, खेल शिवापुर, खेल वर्गे, खेल माळी, खेल पारस, वनूर ,सजनपुरी, राजुरा बुद्रुक राजुरा खुर्द मोहम्मदपुर, ततारपूर, खामखेड येथील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले कपाशी सोयाबीन उडीद मुंग, भाजीपाला यासारखी पिके नष्ट झाली असून शेतमालाला केवळ 30 टक्के भाव मिळत आहे. 
यातच 12 सप्टेंबरला भर पावसात कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावातील शेतीचे नुकसान पाहणी केले आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्यामुळे तीन तीन गावांचा प्रभार आहे. त्यामुळे कागदी घोडे नाचवता शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत द्यावी शेतकऱ्याना मदत न मिळाल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाची निवेदन दिले आहे सदर निवेदन देतेवेळी काँग्रेस चे समाधान दामधर, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, राजीव घुटे, महेंद्र बोडखे, उकर्डा सोळंके, सुनील भगत, सुभाष ढगे, कैलास बोडखे, संजय दलाल, अमोल भगत, गणेश राऊत,मोहन बोडखे, सुभाष धुर्डे, रामदास बोरसे, निखिल वंडाळे, महादेव भगत, स्वप्निल तेटू, किशोर धुळे, विकास धुळे अशोक साबे, दिनेश ढगे, देविदास सावरकर यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.