परभणी प्रतिनिधी
प्रकाशराज लालझरे
खेर्डा महादेव ता.पाथरी येथील शालेय शिक्षण समितीच्या व्यवस्थापन मंडळांवर अध्यक्ष म्हणून श्री रतन बालासाहेब वाहेळ, व सदस्य म्हणून श्री शौकतखॉं बिस्मिल्लाखॉं पठाण यांची निवड झाल्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री गणेशराव लांडगे व प्रसिध्द भारुडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज अम्ले यांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्य यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रसंगी गावातील प्रतिष्ठित शेख अफसर , तुकाराम ढवळे,शेख मुबारक, प्रमोद होगे, ग्रामपंचायत चे डाटा एंट्री ऑपरेटर अशोक गायके, पाथरी अर्बन बँकेचे धनंजय आमले, उमेश आमले, सर्जेराव ढवळे , अण्णासाहेब आमले, हाशम शेख, राहुल वाहेळ, सादिक शेख, रणजीत दादा आमले, खाजामियॉं शेख, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री गणेशराव लांडगे यांनी नवनिर्वाचिकांचे अभिनंदन करुन गावकऱ्यांच्या वतीने त्यांना पुढिल वाटचालीसाठी भरगच्च शुभेच्छा दिल्या अशी माहिती श्री विनायक आमले यांनी दिली.