प्रकाशराज लालझरे
परभणी प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसाने मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.
तालुक्यातील वालुर ,मोरेगाव रायपुर , हातून, व परिसरात अतिवृष्टीदृश्य पाऊस पडला.
यामुळे काढणी कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसलाय.
अनेक शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय,सद्यस्थितीत सोयाबीनची कापणी, काढणी सुरू असून,काही भागात सोयाबीन पिक उभे आहे . मंगळवारी दुपारी वातावरणात अचानक बदल होउन मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला.
एक तास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलेय, त्यानंतर रात्रभर पाऊसाची टीप टीप सुरूच होती.
यंदा पावसाचा खंड, अतिवृष्टी, विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार आहे आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकटं आल्याने शेतकर्यांच्या पदरी काही पडेल की नाही अशी भीती वर्तवली जातेय .