ऐनपुर येथे मोटरसायकल व रोडरोलर चा अपघात एक गंभीर जखमी - JDM

JDM


Breaking

Thursday, October 6, 2022

ऐनपुर येथे मोटरसायकल व रोडरोलर चा अपघात एक गंभीर जखमी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी
योगेश पाटील
ऐनपुर ता रावेर येथील ऐनपुर खिर्डी रस्त्यावर सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाच्या पुढे आवळ्याच्या मळ्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या रोड रोलर व मोटरसायकल यांचा अपघात होऊन मोटरसायकल चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली
सविस्तर वृत्त असे की, 
तालुक्यातील ऐनपुर येथील खिर्डी रस्त्यावर मोटरसायकल व रोडरोलर यांच्यात अपघात होऊन ४६ वर्षीय मोटरसायकल चालकाच्या डोक्याला तसेच पायांवर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता त्या परीस्थितीत ऐनपुर येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोटरसायकल चालकाला ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होत असल्याने जखमी व्यक्ती ला वैद्यकीय अधिकारी डॉ सिध्देश पाटील व डॉ विवेक पाटील यांनी पुढील उपचारासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे समजते मोटरसायकल चालक रेंभोटा गावातील शेखर गाढे वय ४६ असल्याचे समजते.