शौकतभाई शेख
श्रीरामपूर प्रतिनिधी
तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक कारखाना संलग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोकनगर येथील अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात पुणे येथील रुबीकॉन स्कील डेव्हलपमेंट प्रा. लि. यांच्या वतीने 'व्यक्तिमत्व विकास व कौशल्य' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
रुबीकॉन संस्थेच्या वतीने कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून किरण कडुलकर, भक्ती फडते व सुदर्शन भालेराव उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबरोबरच भविष्यात कंपनीमध्ये नोकरीसाठी जाणेकरिता उत्तम संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कसा असावा, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. अंतिम वर्षाचे विद्यार्थी भविष्यात उत्तीर्ण होऊन चांगल्या नामांकित कंपन्यामध्ये किंवा इतर ठिकाणी नोकरीच्या संधी शोधत असतात. नोकरीस जाणेकरिता प्रथम विद्यार्थ्यांची शिक्षणाबरोबरच चांगले बोलणे, चांगले राहणीमान या गोष्टीवरून मुलाखतीमध्ये निवड केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी म्हणून कार्यशाळेमार्फत व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात येतो. यानिमित्त विद्यार्थ्याचे मुलाखतीचे प्रात्यक्षिक घेऊन वेगवेगळ्या टास्कनुसार १२ विद्यार्थ्याची निवड केली. निवड केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज नामांकित कंपन्यामध्ये सादर करण्यात येणार असल्याची माहिती रुबिकॉन कंपनीने दिली.
महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम, क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम, कार्यशाळा, बाहेरील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, तांत्रिक संस्था, कारखाने भेटीसाठी सातत्याने संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे, अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, सहसचिव भास्कर खंडागळे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे तसेच अशोक कारखान्याचे अधिकारी व संचालक मंडळ आदींचे सहकार्य लाभत असते.
भविष्यातही प्रशासनाच्या मदतीने अनेक कार्यशाळा व रोजगार संधी मेळावे महाविद्यालयात आयोजित केले जाणार आहे. यासाठी प्राचार्य अंजाबापू शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अरुण कडू, विभाग प्रमुख प्रा.विशाल घोगरे आदि शिक्षक विशेष परिश्रम घेत आहेत.