सांगली प्रतिनिधी :
लोकसभेत संसदेत साहित्याची खाण साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा अशी मागणी करणारे सांगलीचे खासदार खा.धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली व आण्णा भाऊ साठे यांचे नातू आदरणीय सचिनभाऊ साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय भारतरत्न परिषद पार पडली! जो परकीय देश रशिया आण्णा भाऊंचा सन्मान करतोय ज्या भूमीत ज्या देशात आण्णा भाऊंना उपेक्षित ठेवलं त्या आण्णा भाऊंना 102 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने या देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान करावा यासाठी धैर्यशील माने सतत लढत आहेत. दि.5 सप्टेंबर 2022 रोजी सर्व मातंग समाजाच्या संघटना प्रमुखांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. आण्णा भाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आपल्याला एकत्रित लढायच आहे. खासदार धैर्यशील माने यांचं करावं तितके कौतुक कमीच आहे.संसदेत आण्णा भाऊंच्या कार्याला उजाळा देत संपूर्ण देशाचं लक्ष वेधले.सांगली जिल्ह्यातील बडे बडे नेत्यांनी आण्णा भाऊंना कायम उपेक्षित ठेवण्याचं काम केलं.धैर्यशील माने एक पाऊल पुढे टाकत आहेत त्यांना साथ देऊया.आण्णा भाऊ साठे यांचे नातू तथा आदरणीय सचिनभाऊ साठे यांना बंधू समान मानून साठे कुटुंबाचा ते कायम आदर सन्मान करत असतात.धैर्यशील माने यांच्या कार्यकाळात आण्णा भाऊंचां भारतरत्न ने सन्मान व्हावा हीच अपेक्षा आम्ही करतोय.
या परिषदेला माजी आमदार रामभाऊ गुंडीले साहेब, प्रा.सुकुमार कांबळे (DPI अध्यक्ष मातंग नेते), मा. राजाभाई सुर्यवंशी(मास अध्यक्ष), शंकर भाऊ तडाखे, आशोक लोखंडे, प्रशांत भाऊ सदामाते (या परिषदेचे आयोजनकर्ते) व सर्वच संघटनेचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.