शौकतभाई शेख
श्रीरामपूर प्रतिनिधी
भारतरत्न सर एम.व्ही. विश्वेश्वरय्या यांचे जयंती व आभियंता दिनानिमित्त अशोक पॉलिटेक्निकच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली गुरुवार(ता.१५) रोजी श्रीरामपूर शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॕली काढण्यात येणार असल्याची माहिती अशोक कारखान्याच्या तज्ञ संचालक व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्री मुरकुटे यानी दिली.
यासंदर्भात माहिती देताना सौ. मुरकुटे यांनी सांगीतले की, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती दिवस 'अभियंता दिन 'म्हणून साजरा केला जातो.यानिमित्त अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वतीने गुरुवार ता.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वा. थत्ते मैदानावर सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी तसेच श्रीरामपूर आर्किटेक्ट संघटनेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांचे प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर अशोक पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची सौ.मंजुश्री मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली थत्ते मैदान - मेनरोड ते म.गांधी पुतळा अशी जनजागृती रॕलीचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे,उपाध्यक्ष योगेश विटनोर,सचिव सोपानराव राऊत,अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे, सहसचिव भास्कर खंडागळे तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित राहाणार असल्याचे प्राचार्य अंजाबापू शिंदे यांनी सांगीतले.