शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
अनंत चतुर्थीच्या निमित्ताने गेली दहा दिवस मोठ्या धार्मिक वातावरणात गणरायाचं आगमन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक गणेशभक्त व सार्वजनिक मंडळाच्या वतीने शुक्रवार सकाळ पासूनच नांदूरखी श्रीकृष्ण मंदिराजवळ असलेल्या गोदावरी कालव्यात मोठ्या उत्साहाने विसर्जन करून कोरोना सारख कोणतेही महासंकट देशावर पुन्हा येऊ देऊ नको अशी विनंती करून वाजतगाजत पावसाच्या सरी अंगावर घेत लहानथोर महिला पुरुष यांनी गणरायाचं विसर्जन केले शिर्डीतील अनेक गणेशभक्त सार्वजनिक मंडळे हे सकाळपासूनच आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी नांदूरखी पाटावर हजर झाली होती पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांनी कोपरगावच्या गोदावरीत विसर्जन करण्याऐवजी नांदूरखी गोदावरी कालव्याचे ठिकाण निवडून गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला नांदूरखीच्या रोडलगत असलेल्या शिर्डी विमानतळ मार्गाचीही वाहतूक याच मार्गाने होत असल्याने अनेक गणेशभभक्तांची साई भक्ताच्या गर्दीमुळे तारांबळ उडत होती तर या गर्दीला सुरळीत करण्यासाठी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहायक पोलीस निरीक्षक श्री मती कोकाटे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी त्याचबरोबर
गोपनिय विभागाचे श्री मकासरे पोलीस कॉन्स्टेबल बाचकर पोलीस कॉन्स्टेबल भडकवाड पोलिस कॉन्स्टेबल कुर्हे यांच्यासह वीस ते पंचवीस पोलिस कर्मचारी आपल्या पोलिस फाट्यासह वाहतूक सुरळीत करत होते कोरोनाच्या दोन वर्षांच्या आजाराच्या विश्रांती नंतर सर्वच गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बप्पाला भक्तिमय वातावरणात आपल्या राज्यात सूख शांती लाभावी अशा प्रार्थना करत गोदावरी कालव्यात निरोप दिला अनेक वर्षांपासून शिर्डीतील अनेक गणेश मंडळे गोदावरी कालव्यात श्रीच विसर्जन करतात मात्र कालव्यातील पाणी काही दिवसांनी कमी झाल्यानंतर विसर्जित केलेल्या मुर्त्या उघड्या वर पडतात हे घडू नये म्हनून सामाजिक भान ठेवून या घटनेकडे शिर्डीतील गणेश उत्सव महामंडळाने लक्ष द्यावे अशी मागणी ही सामान्य जनतेकडून होत आहे.