शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
प्रहार जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष आ.बच्चू भाऊ कडु याच्या मार्गदर्शना खाली व प्रहार जनशक्ति पक्षाचे अहमदनगर उत्तरचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय शिंदे पाटील व प्रहार कोपरगांव तालुका अध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगांव अंगारा एसटी महामंडळाचे डी.एम चौधरी साहेब यांना प्रहार विद्यार्थी तालुका अध्यक्ष आकाश काळे यांनी निवेदन दिले त्यात असे म्हटले आहे की पडेगाव एथील विद्यार्थ्यांना एण्यासाठी बस नाही विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तरी आपण लवकर बस चालु करावी त्या वेळेस चौधरी साहेब यांनी सांगितले की दोन दिवसांत विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून दिली जाईल . यावेळी प्रहार विद्यार्थी तालुका अध्यक्ष आकाश काळे, प्रहार संपर्क प्रमुख नवनाथ भाऊ वाघ, प्रहार उपतालुका अध्यक्ष किसनराव सोनवणे, शुभम मानिकराव काळे व विद्यार्थी उपस्थित होते.