नांदूरखी वार्ताहार :
भारतीय लहुजी सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब आव्हाड यांची नुकतीच भारतीय लहुजी सेनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीवर संघटक या पदावर सेना प्रमुख मा.व्ही.जी. रेड्डी यांच्या आदेशावरून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव बाळसाहेब बागुल राज्य सरचिटणीस रामभाऊ पिंगळे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे गेली 20 वर्षांपासून संघटनेचे प्रामाणिक काम करून जिल्ह्यात व राज्यात संघटनेची मोर्चेबांधणी करण्यासाठी परिश्रम घेतल्याने त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
आव्हाड यांनी अनेक सामाजिक प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी तळागाळातील सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे या महापुरुषांच्या विचाराने प्रामाणिक काम केल्याने त्यांना राज्य कार्यकारणीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे ही संधी म्हणजे त्यांनी केलेल्या प्रामाणीक कामाची पावतीच आहे दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हंटले आहे की अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देऊन लोकशाही मार्गाने आपण आपले कार्य जनसामान्यांच्या हितासाठी कराल असे नियुक्ती पत्रात म्हंटले आहे या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल सचिव हनिफ पठाण राज्य कार्याध्यक्ष समीर वीर रजाक शेख रइस शेख रघुनाथ बलसाने शाहीर शहा रामा साळवे संतोष भडकवाड यांच्यासह सर्व समाजाच्या विविध संघटनेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.*
*चौकट:-लहुजी सेनेनी केला रशियाचा अभिनंदनाचा ठराव*
*लहुजी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी रशियाची राजधानी मास्को शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण होत आहे या निमित्ताने केंद्र आणि राज्यातील अनेक नेते मंडळी रशियात दाखल झाले आहेत ज्या महाराष्टात अण्णाभाऊंचा जन्म झाला तेथे अण्णाभाऊंची आजही उपेक्षित तर परदेशात अण्णांभाऊ चा गौरव होतो याबद्दल जिल्हाध्यक्ष मजाबापू साळवे यांनी रशियाचा अभिनंदनाचा ठराव मांडला तर कार्याध्यक्ष समीर वीर यांनी अनुमोदन दिले.