श्रीरामपूर प्रतिनिधी :
शौकत भाई शेख
अहमदनगर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी यांना राज्य शासनाकडून १५ सप्टेंबर या अभियंता दिनी उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.कुलकर्णी व त्यांच्या सौभाग्यवती अंजली कुलकर्णी यांचा सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल अहमदनगर येथील जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रियाजभाई शेख यांनी सा. बां. मंडळ अहमदनगर येथील त्यांच्या कार्यालयात जे.डी. कुलकर्णी यांचा सत्कार केला.
पुर्वी देखील जे.डी.कुलकर्णी अहमदनगर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना अहमदनगर बायपासवरील निंबळक आणि अरणगांव उड्डाणपुलाचे काम त्यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण झाले.
नुकतेच या विकासकामांचे लोकार्पण देखील झालेले आहे,तसेच शहरातील औरंगाबाद रोडवरील भव्य,दिव्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम देखील त्यांच्याच कार्यकाळात अतिशय वेगाने आणि उत्तम प्रकारे पूर्ण झाले आहेत, उत्तम प्रशासकीय अधिकारी आणि पारदर्शक कारभारासाठी जे.डी. कुलकर्णी यांची ओळख आहे. अशा या चांगल्या कामांमुळेच राज्य शासनाच्या वतीने त्यांना उत्कृष्ट अभियता पुरस्काराने गौरवण्यात आले.