कै.तात्यासाहेब नारायण खेडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण - JDM

JDM


Breaking

Thursday, September 22, 2022

कै.तात्यासाहेब नारायण खेडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण


शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
लोणी काळभोर - राजेंद्र उद्योग समूह चे संस्थापक कै. तात्यासाहेब नारायण खेडेकर यांचे बुधवार दि २१ सप्टेंबर २०२२ रोजी  दुसरे पुण्यस्मरण होते.  अनावश्यक खर्च टाळत जिल्ह्यापरिषद प्राथमिक शाळा सिद्रामळा  येथे काशीद,तबुबिया,कदंब, बुच,बोमबोक्स,साग,फणस अश्या विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संतोष जाधव सर यांच्या तसेच राजेंद्र पेट्रोल पंप चे सर्व कर्मचारीवर्ग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी  राजेंद्र पेट्रोल पंप चे मालक श्री.हेंमत खेडेकर, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संतोष सर जाधव, उपशिक्षक दिगंबर सर  सुपेकर, ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, निरक बिका,किरण भोसले,राहुल कुंभार उपस्थित होते.  मान्यवर व जेष्ठ ग्रामस्थ,विद्यार्थी ,शिक्षक, यांनी वृक्षारोपण कार्यक्रमचे कौतुक करत सर्वानी आपले सुख दुःख असणारे कार्यक्रम समाजहित जपत झाडे लावण्याबरोबर इतर कार्य करावे अशी आशा व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .उपस्थित युवकांनीही  कै.तात्यासाहेब खेडेकर यांचे चिरंजीव श्री.हेमंत शेठ खेडेकर यांच्या सारखे समाजहित जोपासणारे अशे विविध उपक्रम आम्ही नक्की राबू असा विश्वास ही या प्रसंगी श्री.हेंमत खेडेकर यांना दिला.