वाशिम/
सहसंपादक :अजय चोथमल
भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने ज्या धम्म बांधवांनी आपले जीवन बुद्ध धम्म संघ या तीन रत्नानाअनुसरून आपले जीवन वाहून नेले अशा धम्म बांधवांचा भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने गुणगौरव व सत्कार करण्यात येणार आहे यापैकीच एक आदरणीय धम्म उपासिका अबिराबाई महादू इंगळे राहणार ब्राह्मणवाडा न. मा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या धम्म उपासिकेने आपले संपूर्ण जीवन आंबेडकर चळवळीमध्ये वाहून नेले या उपाशीकेने जवळजवळ 45 वर्ष समाजसेवा केली. त्यांना लहानपणापासूनच धम्म चळवळीची आवड होती त्यांनी आपल्या गावामध्ये प्रत्येक धम्म कार्याला दानपरिमितेचे पालन करून दानाला जास्तीत जास्त महत्त्व देऊन धम्मदान करत असतात. कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जीवन मार्ग त्या पद्धतीने त्या आपले जीवन वाहून नेतात त्यांनी आपल्या आसपास मधील सर्व खेड्यांमध्ये होत असलेल्या धम्मकार्यामध्ये जाऊन सहभाग नोंदविला आहे.
त्यांच्या पद्धतीने होईल ती मदत त्या नेहमी करत असतात ब्राह्मणवाडा गावांमध्ये त्यांनी आजपर्यंत केलेल्या धम्मकार्य व त्या कार्याचा आढावा मालेगाव तालुका सरचिटणीस राहुल वानखेडे व संस्कार विभाग तालुका उपाध्यक्ष विलास गुडदे यांनी घेतला आहे. लवकरच त्यांना भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांचा गुण गौरव करण्यात येणार आहे. भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने प्रत्येक गावामध्ये आदरणीय ऍडव्होकेट अमोल तायडे, बळीराम पट्टेबहादुर, विजय सोनवणे बोध्दाचार्य, नंदकुमार घुगे, निलेश रोकडे, प्रतीक तायडे, अविनाश वानखडे, आनंद अवचार, यांच्यावतीने घेण्यात येत आहे. अशी माहिती मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल तायडे यांनी दिली आहे.