शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
प्रहार जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष माजी राज्य मंत्री आ.बच्चु भाऊ कडू यांच्या प्रेरणे व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर चे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे पाटील प्रहारचे कोपरगाव तालुका अध्यक्ष संदीप श्रीरसागर याच्या मार्गदर्शना खाली व कोपरगाव प्रहार विद्यार्थी तालुक अध्यक्ष आकाश काळे पाटील माहेगाव देशमुख मध्ये व त्यांचे मित्र परिवार गावांमध्ये बसलेले असतानी माहेगाव देशमुख गावाकडुन कोळपेवाडीच्या दिशेने एक भिक्षेकरू जात असतानी आकाश काळे याच्या डोक्यात एक कल्पना आली त्यानी त्या भिकक्षेकरूची अवस्था बघून गोड बोलून समजुत काढून माहेगाव देशमुख ग्रामपंचायत प्लॅन्ट समोर आनुन आंघोळ घालून कंटीग करून नवीन कपडे घालून त्यांना हॉटेल मध्ये पोटभरून खाऊ घालून वापरायला कपडे दिले. आकाश काळे यांनी नाव विचारल्यावर त्यांनी अनिल शिवरकर असे सांगितले.त्यावेळी आकाश काळे यांनी पोलिस स्टेशन ला कळवळे व त्यांच्या गाडीवरून कोपरगांव येवला नाका येथे सोडले .त्यावेळी माजी राज्यमंत्री नामदार आमदार बच्चू भाऊ कडू साहेब यांच्या पक्षाचे कोपरगांव तालुका प्रहार विद्यार्थी तालुका अध्यक्ष आकाश काळे, संपर्क प्रमुख नवनाथ वाघ, श्रावण धोत्रे , अवधूत जाधव, महेश वणी, भुषण रोकडे, सणी रोकडे, तुषार रोकडे, सिद्धांत रोकडे, शरद रोकडे , पवण जाधव, उणेश रोकडे ,पवार, ग्रामपंचायत कर्मचारी मारूती धोत्रे, संजय उगले व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.