शौकतभाई शेख
श्रीरामपूर प्रतिनिधी
उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यभर कार्यरत असलेल्या चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या अहमदनगर येथे झालेल्या चर्मकार संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये सौ.स्वातीताई सुयोग धस यांची सोशल मिडिया महीला विभाग प्रमुखपदी तर सुखदेव गांगर्डे यांची श्रीगोंदा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चर्मकार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे होते. त्यांच्या हस्ते मा. सौ स्वातीताई सुयोग धस व सुखदेव गांगर्डे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून उपेक्षित आणि दुर्लक्षित गोरगरीब समाज बांधवांना योग्य न्याय देण्याचे काम श्री.साळवे यांच्या नेतृत्वाखालील आणि मार्गदर्शनानुसार करणार असल्याचे यावेळी सौ.स्वातीताई सुयोग धस यांनी सांगितले.
तर मांडवगण ता.श्रीगोंदा येथील तरुण तडफदार कार्यकर्ते सुखदेव गांगर्डे यांची चर्मकार संघर्ष समितीच्या श्रीगोंदा तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व तरुणांना संघटित करून गोरगरीब समाज बांधवांना न्याय देण्याचे काम साळवे साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचे सुखदेव गांगर्डे यांनी यावेळी सांगितले
या कार्यक्रमासाठी राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे,राज्य संघटक नंदकुमार गायकवाड, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष संजय दळवी, जिल्हाध्यक्षा महीला आघाडी सौ.मीनाताई नंदकुमार गायकवाड, जिल्हा संघटक दिलीपराव शेंडे (सर), युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात,राज्यध्यक्ष व सोशल मिडिया प्रसिद्ध विभाग, गोकुळदास साळवे,राज्य उपाध्यक्ष सोशल मिडिया विभाग देविदास कदम,सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जगताप,वधू -वर परिचय केंद्र प्रमुख बापूसाहेब देवरे, राज्य सल्लागार कारभारी चिंधे,राज्य सल्लागार अभिजीत शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रोहिदास उदमले, जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव बोरुडे, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष रामनाथ सोनवणे, जिल्हा युवक उपाध्यक्ष तुळशीराम उदमले, सामाजिक कार्यकर्ते सुयोग धस,युवकांचे प्रेरणास्थान किशोर देव्हारे,युवक कार्यकर्ते सागर दाभाडे,इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.