रमेश जेठे यांची ओल्ड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सल्लागारपदी निवड - JDM

JDM


Breaking

Monday, September 12, 2022

रमेश जेठे यांची ओल्ड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सल्लागारपदी निवड

रमेश जेठे यांची ओल्ड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
श्रीरामपूर प्रतिनिधी
 शौकतभाई शेख

अहमदनगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील मौजे देहरे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा  सा.शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश जेठे (सर) यांची ओल्ड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली( OCCI ) या राष्ट्रीय संघटनेत "राष्ट्रीय सल्लागार " पदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रात धडाडीचे दबंग ‌पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले दैनिक मेहकर टाईम्स आणि दैनिक शौर्य स्वाभिमान चे अहमदनगर प्रतिनिधी तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेश संघटक आणि अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे प्रदेश महासचिव असे विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यासह पत्रकारीता क्षेत्रातील महत्त्वाची कामगीरी बजावत त्यांनी नेहमी उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहोरात प्रयत्न केले आहे व करत आहे,
श्री.रमेश जेठे यांचे सामाजिक कार्य अजोड असल्याने त्यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून संपूर्ण  महाराष्ट्र राज्यातील अनेक असंघटित बांधकाम कामगारांची कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करून अनेकांना शासकीय योजना मिळवून देऊन दिलासा दिला आहे. गरिबांना व दारिद्रय रेषेखालील लाभार्थीना घरकुले मिळणेसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा,कोरोना काळात राज्यात अडकलेल्या अनेकांना घरी जाण्यासाठी सर्वोतोपरी स्वहस्ते परहस्ते मदत, गरजूंना धान्य किटचे वाटप, रेशनकार्ड नसलेल्या गरीब कुटुंबांना पिवळे रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा, अशिक्षित (न शिकलेल्या) व‌ कमी पुरावे असलेल्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून वंचितांना दाखले मिळवून देण्यासाठी पुढाकार,कोरोना संकट काळात पिडीतांना दवाखान्यात नेण्यासाठी अनेकांना सहकार्य, दवाखान्यात मोठ्या प्रमाणात बील आकारणी होत असल्यामुळे अशा लोकांना बील कमी करण्यासाठी करण्यासाठीचे सर्वोतोपरी प्रयत्न,अनेक वंचित लाभार्थीना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न, अशा अनेक विविध सामाजोपयोगी कार्यातून त्यांनी समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे,त्यांचे कार्य निर्पेक्ष आणि निस्वार्थ भावनेचे असल्यामुळे ते समाजांत लोकप्रिय आहेत,म्हणूनच त्यांचे वर फेसबुक, ट्विटरवर,, इन्स्टाग्राम, व्हॅटसअप, कुटूंब ॲप व इतर सोशल मीडिया वरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 त्यांच्या अशा या सलग तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विविध सामाजाभिमुख कार्याची दखल घेऊन ओल्ड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली (OCCI) या राष्ट्रीय संघटनेने त्यांची राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्यानिमित्ताने नगर तालुक्यातील शिंगवे गावचे सरपंच व निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य बाबासाहेब काळे पाटील,वडार समाज संघाचे नगर तालुकाध्यक्ष मुरलीधर शेलार, आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रतिनिधी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर तालुका सरचिटणीस राजेंद्र विठ्ठल मांढुळे पा.यांनी देहरे येथील श्री.जेठे सर यांच्या सा. शिर्डी एक्सप्रेस कार्यालयात शाल, श्रीफळ देत फेटा बांधून आदरपूर्वक सत्कार करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही दिल्यातसेच "शिर्डी एक्सप्रेस" परिवाराच्यावतीने सरपंच ‌बाबासाहेब काळे पाटील, मुरलीधर शेलार व  राजेंद्र मांढुळे पा.यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी वडार समाज संघ प. महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र मंजूळे, हभप सखाराम महाराज जेठे, लक्ष्मण लष्करे, सागर धनवटे, शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह चे कार्यकारी संपादक विशाल जेठे आदी उपस्थित होते.
श्री.रमेश जेठे यांचे सामाजिक कार्य अजोड असल्याने त्यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून संपूर्ण  महाराष्ट्र राज्यातील अनेक असंघटित बांधकाम कामगारांची कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करून अनेकांना शासकीय योजना मिळवून देऊन दिलासा दिला आहे. गरिबांना व दारिद्रय रेषेखालील लाभार्थीना घरकुले मिळणेसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा,कोरोना काळात राज्यात अडकलेल्या अनेकांना घरी जाण्यासाठी सर्वोतोपरी स्वहस्ते परहस्ते मदत, गरजूंना धान्य किटचे वाटप, रेशनकार्ड नसलेल्या गरीब कुटुंबांना पिवळे रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा, अशिक्षित (न शिकलेल्या) व‌ कमी पुरावे असलेल्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून वंचितांना दाखले मिळवून देण्यासाठी पुढाकार,कोरोना संकट काळात पिडीतांना दवाखान्यात नेण्यासाठी अनेकांना सहकार्य, दवाखान्यात मोठ्या प्रमाणात बील आकारणी होत असल्यामुळे अशा लोकांना बील कमी करण्यासाठी करण्यासाठीचे सर्वोतोपरी प्रयत्न,अनेक वंचित लाभार्थीना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न, अशा अनेक विविध सामाजोपयोगी कार्यातून त्यांनी समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे,
त्यांचे काम निस्वार्थ भावनेचे असल्यामुळे ते समाजांत लोकप्रिय आहेत,म्हणूनच त्यांचे वर फेसबुक, ट्विटरवर,, इन्स्टाग्राम, व्हॅटसअप, कुटूंब ॲप व इतर सोशल मीडिया वरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.