सहसंपादक
अजय चोथमल/मालेगाव
भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय. महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने ज्या धम्म बांधवांनी आपले जीवन बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाणा अनुसरून आपले जीवन वाहून नेले.
अशा धम्म बांधवांचा भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने गुण-गौरव व सत्कार करण्यात येणार आहे. मेडशी येथील आद. विजय सिताराम सोनुने वय 65 वर्षे आणि सौ. शारदा विजय सोनुने वय 60 वर्ष राहणार मेडशी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम, या सोनुने दापत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीसाठी वाहून नेले त्यांनी जवळजवळ 30 वर्ष समाज सेवा केली विजय सोनुणे हे मूळचे रहिवासी पांढुर्णा येथील असून त्यांना लहानपणापासूनच बुद्ध धम्माची आवड होती. त्यांनी समाजसेवा हा छंद जोपासला होता.
लहान असतानाच वयाच्या 11 वर्षी त्यांना पंचशील बुद्ध वंदना व संघ वंदना बुद्ध विहारांमध्ये जाऊन घेण्याची आवड होती. शिक्षण संपताच त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली व त्यांनी गीत गायनाच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधनाचे काम केले. त्यांनी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन आपल्या जीवनामध्ये धम्माचे महत्त्व पंचशीलाचे महत्त्व हे नेहमी गीत गाण्याचे माध्यमातून लोकांना समजावून सांगत. नंतर त्यांनी वयाच्या 30 वर्षी मेडशी या ठिकाणी वास्तव्य निर्माण केले. व त्याच ठिकाणी राहू लागले मेडशी या गावात राहत असताना रोज संध्याकाळी बुद्ध विहारांमध्ये जाऊन बुद्ध वंदना, संघ वंदना, धम्म वंदना घेऊन उपस्थित धम्म बांधवांना धम्मा बद्दल माहिती देण्याचे काम करत असतात. त्यांनी मेडशी लगत असलेल्या सर्व खेडोपाडी जाऊन गीत गायनाच्या माध्यमातून लोकांना धम्म समजून सांगितला एवढेच नाही तर त्यांची पत्नी सुद्धा शारदाताई ह्या सुद्धा बराबरीच्या सहभागी आहेत. त्यांनी सुद्धा समाजकार्यासाठी विजय सोनुने यांना वेळोवेळी मदत केली. अतिशय गरीबी परिस्थितीमध्ये कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. समाजसेवा सुद्धा त्यांनी केली. आज प्रत्येक गावामध्ये त्यांच्या नावाचा गवगवा आहे. आणि याच कार्याबद्दल राहुल वानखडे व विलास गुडदे यांनी त्यांच्या कार्याचा अहवाल घेऊन तालुका कार्यकारणी या ठिकाणी सादर केला आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ऍडव्होकेट अमोल तायडे विधी सल्लागार मालेगाव यांनी सुद्धा शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी मंगल कामना व्यक्त केले. आहेत.
आदरणीय सोनुने साहेब यांनी वर्षवासामध्ये बुद्ध आणि धम्म या धम्मग्रंथाचे पटन सुद्धा केला आहे. त्यांनी दररोज बुद्ध विहारांमध्ये जाऊन धम्म बांधवांना धम्म अचरणासोबत आपल्या जीवनात पंचशीलाचे महत्त्व काय याचे सुद्धा समाजाला महत्त्व समजावून सांगितले आहे. लवकरच त्यांना भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने त्यांचा गुण गौरव सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल तायडे यांनी दिली आहे.