इरफान बागवान
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शालेय आरोग्य तपासणी दरम्यान 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून वाचा दोषा वरील मुलांची शासक्रिया दि.30 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय मानवत व ग्रामीण रुग्णालय पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.तांबोळी यांच्या हस्ते डॉ.कल्याण कदम व डॉ. नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ.गजदत्ता चव्हाण , डॉ.ललित कोकरे, डॉ सुशमा भदर्गे ,डॉ.प्रीती दीक्षित डॉ. इक्कर,डॉ.हर्षल देशमुख, सुनील खरात, सचिन कदम, दीक्षा गायकवाड, ज्योती ढवळे मानवत पाथरी सर्व शिक्षक उपस्थित होते.
रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या शिबीर मध्ये एकूण 44 शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या.