सहसंपादक/ मालेगाव
अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील मुस्लिम स्मशान भुमी येथे स्ट्रीट लाईट 2 लक्ष 50 हजार रुपयाचा निधी जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी मंजूर करून आणला आहे. येथील मुस्लिम बांधवांनी येथील मुस्लिम स्मशान भुमी साठी स्ट्रीट लाईटची मागणी केली होती. मेडशी येथील मुस्लिम स्मशान भुमी गावाच्या बाहेर व खुप लांब आहे.
अशातच रात्रीच्या वेळी दफन विधीचा कार्यक्रम करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. येथे रात्रीच्या वेळी अधांरा मध्ये दफन विधी करण्यात येते त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांनी येथे स्ट्रीट लाईट मागणी केली होती.
याचीच दखल घेत जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी या स्ट्रीट लाईट निधी साठी पाठ पुरवठा करून निधी मंजूर करून आणला. मागील काही महिण्या पासून मेडशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध प्रकारची विकास कामे जिल्हा परिषद सदस्या सौ लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी कोट्यावधी निधी मंजूर करून आणुन कामे केले आहेत.
त्यामुळे मेडशी जिल्हा परिषद सर्कल चा मोठ्या प्रमाणात विकास होताना पाहायला मिळत आहे.
तर मेडशी येथील मुस्लिम स्मशान भुमी येथे स्ट्रीट लाईट निधी मंजूर करून आणल्या बद्दल येथील मुस्लिम बांधवांनी जिल्हा परिषद सदस्या सौ लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांचे आभार मानले व अभिनंदन केले आहे.