संजय महाजन
शिर्डी माझे पंढरपुर साईबाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला कीर्तन सोहळा शिर्डी येथे व्हावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे असा दृष्टांत देखील काही साई भक्तांना झालाय तो अनुभव भक्तांनी परम साईभक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय भाऊ कोते यांना सांगितला व हा बाबांचा आदेश समजून विजुभाऊंनी ठरवले की दर महिन्याच्या एकादशीला कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल सोमवार दिनांक ८/८/२०२२ रोजी सायंकाळी 0७ ते ०९ वाजता कीर्तन सोहळा होणार आहे कीर्तनाची नववी सेवा गोंदकर पाटील परिवार यांच्या वतीने होणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण विजुभाऊ कोते यांच्या वस्तीवर शेवंताबाई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी या सोहळ्यातील किर्तन श्रावणाचा व साई खिचडीचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजुभाऊ यांनी केले आहे.