साई गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी' उत्साहात साजरी - JDM

JDM


Breaking

Saturday, August 20, 2022

साई गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी' उत्साहात साजरी

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन 

        शिर्डीत साई मिडीयम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचे अवचित्य साधून गुरुकुल इंग्लीश दहीहांडीचा' कार्यक्रम अति उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मध्ये मुलांनी श्रीकृष्ण, राधा, सुदामा व त्यांचे सवंगडी यांची वेशभूषा परिधान केल्या होत्या. 
         तसेच शाळेतील जे चार हाऊस आहेत त्या सर्व हाऊसमधील मुलांनी, मुलीनी दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केला. व सर्व हाऊसने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. लहान मुले कृष्ण राधाकृष्ण बनून आले होते 'दहीहंडी फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला.
           हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडव्यासवि शाळेचे चेअरमन श्री. तान्हाजी वामनराव गोंदकर सर तसेच शाळेच्या प्राचार्य मंगला नानासाहेब कुन्हे मॅडम यांनी मार्गदर्शन केले व या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपली हिंदू संस्कृतीची जोपासना करण्याचा संदेश कृतीतून मुलांना दिला.
         तसेच शाळेतील इतर शिक्षकवृंद शर्मा मैडम, दिघे मॅडम, राठोड मैडम, अवचर मॅडम मिटके मॅडम, सपकाळ मॅडम, कुमावत, मैडम, घट मैडम, राजपूत मॅडम, सोनवणे मॅडम, मेशराम मॅडम, चौधरी मॅडम, वारुळे मॅडम या सर्वाचे सहकार्य लाभले.