खंडाळा देवी/प्रतिनिधी
मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे या गावामध्ये
दि.21/08/2022 रात्री 1 वाजता च्या सुमारास श्री विश्वनाथ भिकाजी गु-हाळकर यांचे शेतातील गोठ्याला आग लागून दोन गाई अंदाजे किंमत 70,000 /-,1 बैल (वासरू) 30000 /-स्पिंकलर पाईप सट 60000/- pvc 20 पाईप 3000/-शेती अवजार 10000/- असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयाचे नुकसान विश्वनाथ भिकाजी गुऱ्हाळकर यांचे झाले आहे.
यामध्ये 2 गाई,1 बैल जागीच होरपळून मृत्यू झाला आहे हा गोठा हिवरा साबळे शिरात असून गट नंबर 138 मधील 0.25 आर मध्ये आहे यावेळी हिवरा साबळे तलाठी बाजड, सरपंच प्रविण काठोळे, पशुवैद्यकीय डॉ जाधव, डॉ.खंडारे व गावातील संतोष ढोरे, दिलीप ढोरे,शि.गु-हाळकर सह गावकरी उपस्थित होते आगीचे कारण अद्याप कळले नाही.
आग लागने ही नैसर्गिक आपत्तीत असुन सदर मालकास शासनाने पंचनामा करुन तात्काळ नुकसान भरपाई मदत लवकरच देण्यात यावी अशी मागणी
मेहकर तालुका अध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग संदिप ढोरे यांनी केली.