इरफान बागवान
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या डॉ. नेत्रदीप चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने साने गुरुजी वाचनालयास पाच हजार रुपयांचे ग्रंथ भेट देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मानवत येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ.एन.बी. दगडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने येथील साने गुरुजी वाचनालयास स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असणारे पाच हजार रुपयांचे ग्रंथ भेट देण्यात आले. शासकीय भरती साठी स्पर्धा परीक्षा होत असून त्याच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचनालयात असणे आवश्यक असल्याने ट्रस्ट च्या वतीने स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यावेळी डॉ.एन. बी. दगडू, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर कापुरे, डॉ. नेत्रदीप चॅरिटेबल ट्रस्ट चे गणेश मोरे वाचनालयाचे अध्यक्ष संजय लड्डा, सचिव रेनकोजी दहे, शैलेश काबरा, विलास मिटकरी, सुनिता झाडगावकर सूर्यकांत माळवदे, डॉ. सतीश डोंबरे उपस्थित होते.