भोसरी येथे गायत्री सखी मंचच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न - JDM

JDM


Breaking

Saturday, August 6, 2022

भोसरी येथे गायत्री सखी मंचच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न

पिंपरी-चिंचवड 
प्रतिनिधी :विजय भदाणे
     भोसरी येथे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा,गायत्री सखी मंच, भोसरी व स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत दैदीप्यमान भोसरी परिसरातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे लोकप्रिय आ.महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठया उत्साहात पार पडला.
     भोसरी परिसरातील सर्व शाळामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आ. महेशदादा लांडगे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आ. लांडगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबत मैदानी खेळाकडे लक्ष देत स्वताला शारीरिकदृष्ट्या तंदृस्त ठेवावे. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडाळाचे सर्वच उपक्रम लोकप्रिय असतात येथे विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत सामाजिक जीवनात कसे जगावे याचे धडे शिकवले जातात. सदर प्रसंगी पिंपरी – चिंचवड महानगर पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री. संजय नाईकडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री. हनुमंत कुबडे, श्री. रामदास थिटे , श्री. मुरलीधर साठे, श्री. दिगंबर ढोकले आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
 स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष श्री. विनायकराव भोंगाळे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाबाबत व “ नेतृत्वा करीता वाचन ” या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. कविताताई भोंगाळे- कडू यांनी विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले व भविष्यातील वाटलीस शुभेच्छा दिल्या तसेच . विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सौ. कविताताई भोंगाळे- कडू यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या काव्यमंचचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.या प्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसरक मंडळाचे सचिव श्री. संजय भोंगाळे, संचालिका सौ. सरिता विखे ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. अंजली भागवत, कार्यकारी संचालिका सौ. काजळ क्षतीजा, गायत्री विद्यालय मोशीचे मुख्याध्यापक श्री. शशिकांत जोडवे, श्री. गोविंद, गायत्री विद्यालय चरोली च्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री तांगतोडे, सौ. ज्योती बहीरट व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री, भरत बारी यांनी केले तर सौ.कामिनी चव्हाण यांनी आभार मानले.