अजय चोथमल
मालेगाव ते मेहकर रोड शिरपूर बायपास ते अकोला बायपास पर्यंत रोड दुरुस्ती करणे बाबत मालेगाव मनसेचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ डांगे, महिला सेना जिल्हाध्यक्ष सीताताई धदरें यांच्या मार्गदर्शनात मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्या नेतवुत्वात वरील विषयास अनुसरून विनंती पूर्वक निवेदन सादर करण्यात आले. मालेगाव ते मेहकर रोड आणि शिरपूर बायपास ते अकोला बायपास अंदाजे 1 ते 1:50 किलोमीटर रोडची फारच दुरावस्था झाली असून येण्याऱ्या जाणाऱ्याना वाहनानां विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
या रोडवर पूर्ण पणे खड्डे पडून खड्या मध्ये पूर्ण पणे पाणी साचून खड्याच मोटर सायकल चालकाला खड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसन दिवस वाढतंच आहे.
या नंतर कोणताही अनुचित प्रकार घडूनये या साठी येत्या 15 ते 20 दिवसात या रोडचे काम पूर्ण करण्यात यावे हि विनंती.
अन्यथा या रोडचे काम पूर्ण न झाल्यास मनसेच्या वतीने येणाऱ्या काळात आंदोलन करण्यात यईल याची नोद घ्यावी असा ईशारा देण्यात आला. यावेळी मालेगाव तालुका उपाध्यक्ष गजानन पाटिल कुटे, डोंगकिन्ही सर्कल अध्यक्ष रामभाऊ वाघ, आदि मनसे सेनेचे कार्यकर्ते, व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यसंपादक
📲 9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS