विद्या काळे हिने एमबीबीएस चे शिक्षण केले परदेशात पूर्ण - JDM

JDM


Breaking

Tuesday, July 19, 2022

विद्या काळे हिने एमबीबीएस चे शिक्षण केले परदेशात पूर्ण

प्रतिनिधी/ अक्षय वेताळ 
१९८ शिरूर ( पुणे ) - उरळगांव
शाळेत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला असता की भविष्यात तुम्हाला काय व्हायचे आहे. 
तर याचे उत्तर ठरलेले असते.  किमान महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीत तरी दोन नमुनेदार उत्तरे तयार असतात. ते म्हणजे डॉक्टर आणि इंजिनिअर. शंभर विद्यार्थ्यांपैकी किमान ८० टक्के विद्यार्थ्यांचे उत्तर हेच असते.अश्याच एका गरीब कुटुंबातील मुलगी विद्या बबन काळे हिने एमबीबीएस मारी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, योष्कर ओला, रशिया या ठिकाणाहून एमबीबीएस चे शिक्षण नुकतेच पूर्ण केले.
विद्या काळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातिल व शेतकरी घरातील मुलगी आहे अश्या कठीण परिस्थितीत हिने आपले शिक्षण हे बाहेर देशात पूर्ण केले. 
हया सगळ्याचे श्रेय माझ्या आई वडिलांचे जाते. त्याशिवाय परदेशात शिक्षण करणे हे माझ्यासाठी कधीच शक्य न्हवते गेली ६ वर्ष त्यांनी खुप मेहनत करून मला शिकवले. 
एका शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणे ते ही दुस-या देशातून हे माझे भाग्य आहे.माझ्या बहिणींनी व माझ्या दाजीनी व माझ्या कुटूंबानी मला खुप साथ दिली.मी आयुषभर सगळ्या ची ऋणी राहिल.
असे मत विद्या काळे हिने पत्रकारशी बोलताना व्यक्त केले.

╭═══════╮
       मुख्यसंपादक
     📲 9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS