अजय चोथमल
रिसोड तालुक्यातील पावली येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा नावली च्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्र्विन पौर्णिमे पर्यंत लिंबुणी बुद्ध विहारात मध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचनास प्रारंभ झाला आहे
ग्रंथ वाचन गणेश कवडे गोवर्धन सर्कल प्रमुख भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुका हे करीत आहेत.
प्रथम उपासक आणि उपासिक कडून तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण अष्ट शीला चे घेतल्या त्यानंतर वाचण्यात सुरुवात केली.
ग्रंथाचे अध्यक्ष मनेका ताई, उपस्थिती मध्ये रेखाताई खरात, मंगलताई खरात, निताताई खरात, सुजाता खरात, मालताबाई खरात, गोदावरी बाई खरात, निकिता खरात, सुनिता खरात, सुरेखा कवडे, गजानन गो. खरात, किशोर ल. खरात, हरिभाऊ खरात, मेजर रमेश खरात व सर्व उपासक व उपासिका उपस्थित होते.