अनाधिकृत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
जालना प्रतिनिधी-
संभाजी कांबळे
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जिल्ह्यातील गावठी दारू, मटका, अवैध गुटखाविक्री आदींसह सर्वच अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडून, धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत.अवैध धंद्याबरोबरच डॉ. शिंदे यांनी आता जिल्हा पोलीस दलातील अनधिकृत गैरहजर आणि कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष केले आहे.कर्तव्यावर सतत गैरहजर राहणाऱ्या तब्बल 11 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.यामध्ये पोलीस मुख्यालयातील 4, भोकरदन पोलीस ठाण्यातील 3, कदीम जालना पोलीस ठाण्यातील 2 आणि तालुका जालना व जाफराबाद पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, अशा एकूण 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार जाधव, पोहेकाँ. दांडगे, नापोकाँ. मदनुरे, पोकाँ. पवार, भोकरदन पोलीस ठाण्यातील पोहेकाँ. सरदार, पोहेकाँ. गायकवाड, पोकाँ. ढोके, कदीम पोलीस ठाण्यातील नापोकाँ. संदीप म्हस्के, नापोकाँ. पिराने, तालुका पोलीस ठाण्यातील नापोकाँ. सूर्यवंशी, जाफराबाद पोलीस ठाण्यातील पोहेकाँ. खिल्लारे यांना सतत गैरहजर असल्याने निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS