मराठा समाज उपसमितीचे पुनर्गठन, अध्यक्षपदी आता राधाकृष्ण विखे पाटील
मराठा आरक्षणाचा विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या उपसमितीचे पुनर्गठन केले आहे. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते. जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिय सुरळीत राबवणे, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रीमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत.
मराठा समाजाच्या उपसमितीत राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री (अध्यक्ष) याशिवाय सदस्यांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील या 11 जणांचा समावेश असेल. सोबतच उपसमितीचे सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागांच्या सचिवांकडे जबाबदारी असेल.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. 29 ऑगस्ट रोजी जरांगे हे मुंबईत धडकणार आहेत. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार जरांगेंनी केला आहे.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859