मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
या भीषण अपघातात एका जोडप्याचाही मृत्यू झाला. तर या जोडप्याची पाच वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. आई-वडिलाच्या मृत्यूने वयाच्या पाचव्या वर्षी चिमुकली पोरकी झाली.
सध्या ५ वर्षीय चिमुकली जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांचा आधार गेल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चिमुकलीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर पहाटेच्या सुमारास ५ वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. तर या जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातामधील जखमींवर ठाणे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पियुष पाटील आणि रूंदा पाटील या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 5 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. या मुलीवर शहापूर येथील क्रीस्टीकेअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.