सोयगाव प्रतिनिधी/
गजानन सपकाळ
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील हारि हारेश्ववर विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर दि.१९/१/२५ रवीवार रोजी रक्तदान महायज्ञ - 90 रक्तदात्यांनी केले रक्तदान अनंत श्री विभूषित जगतूरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने - दरवषीप्रमाणे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही सावळदबारा संप्रदाय सेवा समितीच्या वतीने महारक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सकाळी नऊ वाजता जगदूरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन काशीनाथ वावरे महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर, समाधान गायकवाड, प्रा.जीवन कोलते पाटील, भोकरे, एकनाथ गवई (पाहुणा) व यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तादान संकलनास सुरुवात करण्यात आली.
रक्तदान महायज्ञात 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी उशिरा पर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू होता. रक्त संकलनाचे रेड प्लस रक्त पेढी जळगाव (खान्देश), सोयगाव यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी सावळदबारा सांप्रदायिक संप्रदाय सेवा समिती व संप्रदाय सेवा समितीच्या सेवेकन्यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी समाधान श्रीराम गायकवाड,प्रा जीवन कोलते पाटील, मॅनेजर काशीनाथ वावरे, हेमंत पाटील, शांताराम खराटे, भागवत महाजन, विशाल महाराज खडके, दगडू नरोटे, विनोद जाधव, नारायण कांडेलकर, भिमराव सुरडकर,सुर्यभान चांडोल,राजू जाधव, संतोष पाटील, भोकरे सर, आकाश समाधान गायकवाड, विनोद बंलाडे, भागवत गावडे भागवत साबळे,संगीता बलांडे, शारदा शिरसाट, रुपाली जाधव, कौशल्याबाई जाधव,नंदाबाई सोनोने, शकुंतलाबाई जाधव,उषाबाई खराटे, मारोती लवंगे आदीने परिश्रम घेतले.