Vanraj Andekar Case: दोघी बहिणी गॅलरीत उभे राहून चिथावणी देत होत्या..? वनराज आंदेकरच्या हत्येमागची A to Z स्टोरी, का रचला कट? - JDM

JDM


Breaking

Tuesday, September 3, 2024

Vanraj Andekar Case: दोघी बहिणी गॅलरीत उभे राहून चिथावणी देत होत्या..? वनराज आंदेकरच्या हत्येमागची A to Z स्टोरी, का रचला कट?


Vanraj Andekar Case: दोघी बहिणी गॅलरीत उभे राहून चिथावणी देत होत्या..? वनराज आंदेकरच्या हत्येमागची A to Z स्टोरी, का रचला कट?

एक सप्टेंबर २०२४ स्थळ पुण्यातील नाना पेठ वेळ रात्री ८.३० च्या दरम्यान अचानक गोळीबाराच्या आवाजांनी आसपासचा परिसर हादरला. एकामागून एक असे ५ राऊंड फायर केले गेले. या हल्ल्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असणाऱ्या वनराज आंदेकर यांची निर्घुण हत्या करण्यात आली.

सहा गाड्यांवरून आलेल्या १२- १३ जणांच्या टोळक्यानं सिनेस्टाईलनं हा हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार झाला आणि नंतर कोयत्यानं सपासप वार करत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं पुणे शहरं पुन्हा एकदा हादरलं. सुरुवातीला हे गँगवॉर प्रकरण वाटतं होतं. कारण आंदेकर टोळी ही पुण्यात गुन्हेगारीतलं चर्चेतलं नाव. पण सीसीटीव्ही सापडला, हत्येचा उलगडा झाला आणि वनराजच्या हत्येमागची धक्कादायक माहिती समोर आली.

लाडक्या बहि‍णींनीच आपल्या नवऱ्यांसोबत मिळून आपल्या सख्खा भावाला संपवलं. पण या बहिणींनी आपल्याच भावाचा घात का केला? 

वनराज आंदेकर नेमका कोण?

पुण्यातील काही टोळ्यापैकीच एक म्हणजे नाना पेठेतील आंदेकर टोळी. गेल्या २५ वर्षांपासून या टोळीची पुण्यातील मध्यवर्ती भागात दहशत आहे. या टोळीचा मोरक्या म्हणजे बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, शस्त्रे बाळगणs अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सूर्यकांत आंदेकर याच्या विरुद्ध फरासखाना, खडक व समर्थ या पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. पुण्यासोबत साताऱ्यातील खंडाळा पोलिस ठाण्यात देखील काही गुन्हे दाखल आहेत.

टोळी युद्धातूनच प्रमोद माळवदकर या गुंडाचा आंदेकर टोळीकडू खून करण्यात आला होता. या प्रकरणात सूर्यकांत आंदेकरला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर आंदेकर टोळीकडून अलिकडेच अतुल कुडले याच्या खुनाचाही प्रयत्न झाला होता. आंदेकर टोळीच्या याच गुन्हेगारी कारनाम्यांमुळे पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्यासह अन्य सहा जणांवर मोक्का कारवाई केली होती. मात्र या प्रकरणात त्याला ५ जानेवारी २०२४ रोजी जामीन मिळाला होता.

याचं बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरचा मुलगा म्हणजे हत्या झालेले वनराज आंदेकर. बाप टोळीचा म्होरक्या पण वनराज नाव अजूनही तरी कोणत्या मोठ्या गुन्ह्यात समोर आलं नव्हतं. वनराज आंदेकर २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या आधी त्यांच्या आई राजश्री आंदेकर आणि चुलत भाऊ उदयकांत आंदेकर देखील नगरसेवक होते. २००७ आणि २०१२ मध्ये राजश्री आंदेकर नगरसेवक म्हणून दोन वेळा निवडून आल्या होत्या. वनराज यांच्या कुंटुबातीलच वत्सला आंदेकर यांनी 1998-99 मध्ये पुण्याच्या महापौर म्हणूनही काम पाहिलं आहे.

याच वनराजला दोन बहीणी संजीवनी जयंत कोमकर आणि कल्याणी गणेश कोमकर. पण संपत्तीच्या वादातून या दोघी बहिणी आणि वनराजमध्ये वाद सुरु होते. गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई. आंदेकर कुटुंबाच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करीत होता. त्यानं स्वत:ची देखील गँग तयार केली होती. दरम्यान गणेश कोमकरला नाना पेठेतील एक दुकान दिले होते.
महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले. इथून बहीण भावातील भांडण विकोपाला गेली. त्यात आंदेकराच्या कुटुंबातील एका व्यक्तीसोबत गणेश कोमकरचा वाद झाला. त्यात गणेशला मारहाण झाली. त्यामुळे ही झालेली मारहाण आणि दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावलं या रागातून बहिणीनं वनराजला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.

JD महाराष्ट्र NEWS 

यातचे काहीच दिवसांपुर्वी आंदेकर कुटुंबाकडून आमच्या जीवाला धोका आहे, असा अर्ज कोमकर कुटुंबाने समर्थ पोलीस ठाण्यात दिला होता. दोन्ही कुटुंबातील वाद इतके विकोपाला गेले होते. यातचं ही हत्या घडवून आणल्याचं बोललं गेलं. गणेश कोमकरनं याआधी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला होता. त्यामुळे वनराजला सुद्धा आपल्यावर देखील हल्ला होईल याची भीती होती. त्यामुळे वनराज कायम टोळीतील पोरांसोबत असायचा.

पण त्यादिवशी घरातील कार्यक्रम होता. त्यामुळे वनराजसोबत मुलं नव्हती. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याच्याबरोबर एक नातेवाईकही होता. वनराजसोबत पोरं नाहीत याचाच फायदा हल्लेखोरांनी घेतला आणि ५ ते ६ दुचाकीवरुन १० ते १२ हल्लेखोर आले. आंदेकरवर एका पाठोपाठ ५ गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही जणांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यात आंदेकर जागेवरच कोसळला. एका मिनिटात झालेल्या या घटनेनंतर दुचाकीवरुन आलेले सर्व हल्लेखोर पळून गेले. हल्ल्यात जखमी झालेल्या वनराज आंदेकर याला के ई एम रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याआधीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलं.


दुसराच अँगल समोर

ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं बोललं जातं पण यातच एक दुसरा अँगल देखील आहे. तो म्हणजे आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत आणि वनराज गुन्हेगारीपासून तसा लांबच होता. त्याला गुन्हेगारी संपवायची होती. पण टोळीलाच एक सोमनाथ गायकवाड, ज्याला ही टोळी संपू द्यायची नव्हती. त्यामुळे तो टोळीतल्या कोही पोरांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत होता. यातचं काही गुन्ह्यामुळे त्याला तडीपार व्हावं लागलं. सोमनाथ गायकवाडला आपल्या मागील या कारवाई मागे वनराज असल्याचा संशय होता. आणि वनराजचा कौटुंबिक वाद हा चांगलाच माहित होता. याचाच फायदा घेत सोमनाथ गायकवाड हा वनराजची बहीण आणि दाजींना जाऊन मिळाला आणि वनराजचा काटा काढला. सख्खा बहिणी आणि दाजींनी वनराजचा जीव घेतला.

असं म्हंटलं जात की आरोपी हल्ला करीत असताना या दोघी बहिणी गॅलरीत उभे राहून मारा मारा अशी चिथावणी देत होत्या. ही सगळी फिर्याद वनराजचे वडील बंडू आंदेकर यांनी दिली. यानंतर संजीवनी आणि कल्याणी दोन्ही बहिणी. जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह 10 आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.



JD महाराष्ट्र NEWS 
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859