अक्षयने काहीच केलं नाही, तो डोक्याने अधू.; बदलापूर प्रकरणातील नराधमाच्या आई वडीलांचा दावा - JDM

JDM


Breaking

Thursday, August 22, 2024

अक्षयने काहीच केलं नाही, तो डोक्याने अधू.; बदलापूर प्रकरणातील नराधमाच्या आई वडीलांचा दावा


अक्षयने काहीच केलं नाही, तो डोक्याने अधू.; बदलापूर प्रकरणातील नराधमाच्या आई वडीलांचा दावा

बदलापूर : बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केले. अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर केलेल्या या अत्याचारामुळे राज्यभरातून संताप उफाळून आला.

सर्वांनी या प्रकरणावर कडक कारवाई करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मागणीसाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर दिवसभर आंदोलन सुरु होते. यानंतर आता बदलापूर अत्याचार प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे याच्या आई वडीलांनी तो निर्दौष असल्याचा दावा केला आहे. अक्षयने काहीही केले नाही त्याला फसवलंय जात आहे, असा दावा नराधमाच्या आई वडीलांनी केला आहे.


एका वृत्तवाहिनीने फोनवर संपर्क करुन बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या आई वडिलांशी बातचीत केली. यावेळी आम्हाला घरात येऊन लोकांनी मारहाण केली, पोलिसांनी मुलाला मारहाण केली. आमचा मुलगा निर्दोष आहे, असे वक्तव्य त्याच्या आई वडीलांनी केले आहे. अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्याच्या आई वडीलांनी केला आहे. त्यामुळे आता बदलापूर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


काय म्हणाले अक्षयचे आई वडील?

अक्षयचे आई-वडील फोनवर म्हणाले, "अक्षयला कामाला लागून फक्त 15 दिवस झाले होते. 17 तारखेला त्याला पोलिसांनी धरुन नेलं. त्याला पोलिसांनी नेलं इतकंच आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांनी अक्षयला मारहाण केली. माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. शाळेमध्ये अक्षय फक्त 11 वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम त्याला दिलेलं नव्हतं. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की झाडू मारायला जायचो. आमचं सगळं कुटुंबच तिथे कामाला होतं," असे मत अक्षयच्या आई वडीलांनी व्यक्त केलं आहे.


आम्हाला घराबाहेर ढकलून दिलं

माध्यमांशी अक्षय गतीमंद होता का असा सवाल विचारला असता, ते म्हणाले, "नाही, पण त्याला छातीचं दुखणं होतं. अक्षय डोक्याने थोडा अधू आहे. लहानपणी त्याला थोडं दुखणं होतं, डोक्याने थोडा कमजोर होता. त्याला औषधोपचार सुरु होते. अक्षयने हा काही प्रकार केलेला नाही." असा दावा अक्षयच्या आई वडीलांनी केला आहे. त्याचबरोबर अक्षय शिंदे याच्या कुटुंबाच्या राहत्या घरी देखील स्थानिक लोकांनी तोडफोड केली. आमच्या घरात लोक शिरले, आम्हाला मारहाण करण्यात आली आणि घराबाहेर ढकलून दिलं. तुम्ही इथे राहूच नका असं आम्हाला सांगितलं. आमचं कुणी काही ऐकूनच घेतलं नाही," असे अक्षयच्या आई वडीलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.


JD महाराष्ट्र NEWS

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859