बदलापूर अत्याचार प्रकरणी 'सुमोटो' याचिकेवर सुनावणी सुरु! न्यायालयात काय घडलं? - JDM

JDM


Breaking

Thursday, August 22, 2024

बदलापूर अत्याचार प्रकरणी 'सुमोटो' याचिकेवर सुनावणी सुरु! न्यायालयात काय घडलं?


बदलापूर अत्याचार प्रकरणी 'सुमोटो' याचिकेवर सुनावणी सुरु! न्यायालयात काय घडलं?

ठाणे: बदलापूर अत्याचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, यावेळी राज्य सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ बाजू मांडणार आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटीदेखील स्थापन करण्यात आली आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने काही सवाल केले आहेत. हे प्रकरण पॉक्सो अंतर्गत येत असूनही गुन्हा दाखल करण्यात उशीर का झाला? असा सवाल न्यायालयाने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना केला आहे. तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

बदलापूरमध्ये एका शाळेत तीन आणि चार वर्षांच्या दोन लहान मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली असून त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


JD महाराष्ट्र NEWS 
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859