धक्कादायक! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचार
मुंबई:
बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांच्याबाबत आणखी एक संतापजनक माहिती समोर येत आहे. शिंदे याने आणखी एक चिमुरडीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
शाळेतील आणखी एका मुलीवर त्याने अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नव्या माहितीने पुन्हा खळबळ उडाली.
अक्षय शिंदे याला सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या नवीन धक्कादायक खुलाश्याने शहरात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. तसेच आरोपीने अजून किती मुलींवर अत्याचार केले याचीही पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.