चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाचा खेळ खंडोबा; सिव्हिल सर्जन यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष :बबनराव शेळके - JDM

JDM


Breaking

Friday, July 21, 2023

चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाचा खेळ खंडोबा; सिव्हिल सर्जन यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष :बबनराव शेळके

पंचक्रोशीतील शेकडो गोरगरीब रुग्णांवर अन्याय

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
अनेक वेळा आम्ही भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याचे वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करून उपोषण करून हॉस्पिटल मध्ये मशनरी आणल्यात. डॉक्टर आणले परंतु पुन्हा सध्याच्या सिव्हिल सर्जन यांनी, ग्रामीण रुग्णालयाचा तीन -तेरा, नऊ -बारा, वाजल्यात .डॉक्टर नाहीत, सिस्टर नाही, काही सिस्टर डेपोटेशन तत्त्वावर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये काम करतात, सर्व अधिकाऱ्यांची त्वरीत नियुक्ती करावी.व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसवलेल्या ग्रामीण रुग्णालयातील मशनरी त्वरित ग्रामीण रुग्णालयात बसवाव्यात, चिचोंडी पाटील येथील मशनरी अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आल्यात. 

शासनाने गोरगरीब जनतेसाठी उभारलेल्या 3 कोटि रुपयांच्या हाॕस्पिटलचे सिव्हिल सर्जन कडून खेळखंडोबा , सिव्हिल सर्जन यांनी 15 दिवसात सर्व पदावरती डॉक्टर आणि सिस्टर भरावेतअन्यथा भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सरचिटणीस बबनराव शेळके यांनी दिला आहे.
आम्ही आमच्या गोरगरीब रुग्नांची हेळसांड होऊ देणार नाहि असेही शेळके म्हणाले .