शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या मोदी ९ विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाविजय २०२४ या अभियानातंर्गत कार्यकर्ते सोबत टिफीन पार्टी चे आयोजन आज ०५साक्री (अ.ज.) विधानसभेतील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आदिशक्ती धनाई-पुनाई माता मंदिर येथे संपन्न झाली.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.राजेंद्र गावित यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विधानसभा प्रमुख इंजि.मोहनराव सूर्यवंशी प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.लिलाताई सूर्यवंशी यांचा उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत मा.राजेंद्र गावित यांनी महाविजय २०२४ कसे यशस्वी करावे या साठी मार्गदर्शन केले व इं.मोहनराव सूर्यवंशी यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देऊन घर घर संपर्क अभियान राबवले.
प्रवीण देसले, सुनील माळी, कन्हैया लाल माळी, रावसाहेब खैरनार,अजय बच्छाव,डॉ. कन्हैयालाल साबळे, दत्तू बोरसे,राजेंद्र पाटील मुकेश पाटील, शिवचरण सूर्यवंशी,भागवंत देशमुख, अजय अहिरे,वसंत बागुल,ताराचंद चौधरी, मोतीलाल गांगुर्डे, जेपी सिंग, अरूण सुर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, अमोल ठाकरे आदीसह शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख उपस्थिती होते
मनोज सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.