लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी - JDM

JDM


Breaking

Friday, June 2, 2023

लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी


श्रीरामपूर प्रतिनिधी:
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचेकडे दुरदृष्टी होती. त्यांनी "शेतकरी सुखी तर जग सुखी" या संकल्पनेतून शेतकर्‍यांना जाचक करामधून मुक्त केले होते. भारतातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली. त्याकाळात त्यांनी पाण्याचे महत्व जाणून "पाणी अडवा, पाणी जिरवा" ही संकल्पना राबविली. आजच्या आपत्तीच्या काळामध्येही अहिल्यादेवींनी केलेल्या पाणी व्यवस्थापनाचा व त्यांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
     लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, रोहन डावखर, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, कारेगाव भाग कंपनीचे संचालक भगवान सोनवणे, शेतकरी सेवा केंद्राचे अमोल कोलते, अनिल कुलकर्णी, संदीप डावखर, बाळासाहेब शिंदे, वैभव सुरडकर, पंकज देवकर आदींसह लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच अशोक कारखाना कार्यस्थळावरही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी संचालक हिम्मतराव धुमाळ, नारायणराव बडाख, पर्सोनेल मॅनेजर लव शिंदे, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, बाळासाहेब तागड, अनिल खरात, संदीप बनकर, विलास लबडे, भारत वैरागर, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.