मुक्ताईनगर,पंकज तायडे
बहीण भावाच्या भाऊबीजेच्या पवित्र सनानिमित्त आदिशक्ती मुक्ताईला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपेगाव यांच्याकडून परंपरेने भाऊ बिजलेला साडी येत असते.
यंदा देखील आळंदी आणि आपेगाव या दोन्ही देवस्थानांकडून आलेली भाऊबिजेची साडीरूपी भेट आदिशक्ती मुक्ताबाईनां अर्पण करण्यात आली.
शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा देखील हरिभक्त परायण रविंद्र महाराज हरणे यांनी विधिवत पूजन करत पार पडली.