आझाद ग्रुपने; पालावर मिठाई वाटून दिवाळी साजरी - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 26, 2022

आझाद ग्रुपने; पालावर मिठाई वाटून दिवाळी साजरी


लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद ग्रुप तालुका शाखा लोहा ने सामाजिक बांधिलकी जोपासत  पालावरील नागरिकांना मिठाई वाटप करून दिवाळी साजरी केली.
 आपल्या भारत देशातील सर्वात मोठा सण हा दिवाळी असतो  या सणानिमित्त सर्व नागरिक हे गोड -खमंग  पदार्थचा फराळ खायायला करतात कपडे घेतात फटाक्यांची आतिषबाजी करून दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात पण आज ही अनेकजण हलाखीचे जीवन जगत आहेत आहेरे व नाहिरे वर्ग आज ही मोठ्या प्रमाणात आहे.
तेव्हा या पालावरील  नागरिकांचे हे तोंड दिवाळी सणा निमित्त गोड व्हावे या हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासत आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद ग्रुपचे लोहा तालुका अध्यक्ष रूद्रा पाटील भोस्कर यांनी आझाद ग्रुप तालुका शाखा लोहा च्या वतीने लोहा शहरातील पालावरील नागरिकांना मिठाई वाटप करून दिवाळी साजरी केली.
 यावेळी आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे, आझाद ग्रुपचे लोहा तालुका अध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर, शहराध्यक्ष  साईनाथ आणेराव , पत्रकार विलास सावळे, सोशल मिडिया प्रमुख केंद्रे , नागेश लोंढे, गोविंद शेवडकर, राजूभाऊ हुलसुरे, बाळू सोनटक्के, संदीप कोरडे, रितेश देशमुख ,सुदाम लोंढे , अतुल कहाळेकर, शुभम कहाळेकर,आदी उपस्थित होते.