प्रतिनिधी : रितेश खऊल
दर्यापूर
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर मद्ये वन्यजीव साप्ताहिक साजरा करतात आला दिनांक 6/10/22 रोजी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आले त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अतुल बोडखे सर आणि पर्यावरण विज्ञान तज्ञ डॉ.गजानन मुरतकर सर यांचा हस्ते करण्यात आले , पोस्टर स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पोस्टर तयार करून प्राण्यांच्या मनातील मनोगत व्यक्त केले तसेच आदरणीय डॉ. गजानन मुरतकर सर यांनी विद्यार्थ्यांना प्राण्यांवर मार्गदर्शन केले. आणि प्राणी काळाची गरज यावर मार्गदर्शन केले .
दिनांक 7/10/22 रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ अतुल बोडके सर, आणि प्राणीशास्त्राचे निलेश किसवे सर प्रीती दिवाण मॅडम आणि रसायनशास्त्राचे शुभांगी सोनवणे मॅडम यांच्या हस्ते झाले रांगोळी स्पर्धेमध्ये विविध प्राण्यांच्या रांगोळ्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले होते.
तसेच दिनांक 8/10/22 रोजी भूगोल विभागाचे डॉ.सावंत देशमुख सर अतिथी व्याख्यान म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना , चित्ता बद्दलचे भविष्य आणि त्याचे रूपांतरण आणि व्यवस्थापन यावर व्याख्यान करण्यात आले आणि प्राचार्य डॉ.अतुल बोडके सर.डॉ सावंत देशमुख सर यांच्या हस्ते पोस्टर्स स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले असा तीन दिवसीय वन्यजीव दिवस महाविद्यालय मध्ये साजरा करण्यात आला त्या वेळेस प्राणीशास्त्राचे दिवाण मॅडम, किसवे सर. वनस्पती शास्त्राचे जयस्वाल सर , काळे सर गोपकर सर .. रसायनशास्त्राचे-सावरकर सर ,सोमवंशी सर,सोनवणे मॅडम, इत्यादी शिक्षक उपस्थित होते.