नवरात्र उत्सवानिमित्त श्री.क्षेत्र मोहटादेवी मंदिरात जागरण गोंधळ; भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पाडला - JDM

JDM


Breaking

Thursday, October 6, 2022

नवरात्र उत्सवानिमित्त श्री.क्षेत्र मोहटादेवी मंदिरात जागरण गोंधळ; भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पाडला


नेवासा प्रतिनिधी 
रवींद्र लिंबोरे
दि. ५-१०-२०२ गोदावरी नदीच्या कडेवर वसलेले जैनपुर गाव या या गावांमध्ये श्री क्षेत्र देवी मोहटा मंदिर आहे.या मंदिरामध्ये दरवर्षी सालाप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या संख्येने साजरा करतात.
हे मंदिर 25 ते 30 वर्षांपूर्वीबांधलेले आहे.
या मंदिरामध्ये दोन वेळेस आरती पारार पडत असते.
रोज संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते रोज संध्याकाळी मोठ्या संख्येने गावकरी व तसेच पंचक्रोशीत आसपासचे गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
देवीच्या ठिकाणी जागरण गोंधळ व भंडाराचा कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडला.
नवरात्र  उत्सव काळात भक्तगण हे मंदिरात ठाण मांडून असतात.
शेजारच्या खेड्यापाड्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन  भक्तांनी " आई जगदंबा माता की जय" "जय मातादी घोषणा" देत गावातील वातावरण दुर्गमय केले.त्यावेळी आलेल्या  भक्तांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आभार मानले.