मुक्ताईनगरात लाखोंचा विमल गुटख्याची गाडी पकडली; कारवाई मात्र गुलदस्त्यात - JDM

JDM


Breaking

Sunday, October 23, 2022

मुक्ताईनगरात लाखोंचा विमल गुटख्याची गाडी पकडली; कारवाई मात्र गुलदस्त्यात

मुक्ताईनगर प्रतिनिधी
पंकज तायडे
मुक्ताईनगर येथे अंदाजे 14 ते 15 लाखाचा विमल गुटख्याचा माल असलेली गाडी पकडण्यात आली असून मात्र, याबाबत कुठली कारवाई करण्यात आली यांची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.
मुक्ताईनगर येथील पुरनाड फाट्यावर नाशिक येथील आईजी पथकाकडून काल MH 19BM 5400 या बोलेरो पिकप वाहनावर कारवाई करत गाडी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली असून कारवाई अद्याप गुलदस्तात आहे तरी एवढा मोठा माल असलेली गाडी काल पासून पोलीस ठाण्यात लागून असून सुद्धा मुक्ताईनगर पोलीस कारवाई बाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिक शंका उपस्थित करत असून पुरणाड फाट्यावरील चेक पोस्टवर आरटीओ 24 तास हजर असताना देखील विमल गुटक्याची गाडी पास झाली कशी याबाबत सुद्धा नागरिक प्रश्न उपस्थित करीत पोलिस विभागाच्या आर्थिक हितसंबंधांची किनार असल्याचे परिसरात बोलले जात आहे.