मानवत प्रतिनिधी
इरफान बागवान
दिवाळीच्या उत्सवाच्या काळात मानवत शहरातील नागरिकांनी घराला कुलूप लावून गावी जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, शेजाऱ्यांना व पोलीसांना गावी जात असल्याची कल्पना द्यावी. संशयित रित्या कुणी आढळल्यास मानवत पोलीस स्टेशन ला संपर्क करावे.
रस्त्यावर फिरत असताना आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी तसेच सध्या दीपावली उत्सव सुरू असल्याने बाजारात खूप गर्दी वाढलेली आहे, त्याच गर्दीचा फायदा चोर गुन्हेगार घेतात त्यामुळे नागरिकांनी बाजारात किंवा दुकानात जाताना खरेदी करताना आपले दागिने पर्स पाकीट बॅग सांभाळावेत. दीपावली मुळे बँकेतही गर्दी चे स्वरूप आलेले आहे पैसे काढत असताना सतर्कता बाळगावी व पैसे सुरक्षित घरी न्यावे, दरम्यान जर संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ मानवत पोलीस स्टेशन येथे संपर्क साधा असे आवाहन मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फिरोज पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी केले आहे.