कारेगाव येथे ६६वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा - JDM

JDM


Breaking

Friday, October 7, 2022

कारेगाव येथे ६६वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

लोहा प्रतिनिधी
संगम पवार
लोहा तालुक्यातील मौजे कारेगाव येथील नालंदा बौध्द विहार येथे मोठ्या उत्साहात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.
प्रथमता: तथागत भगवान गौतम बुध्द आणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतीमेची पुष्प पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यांना अभिवादन करून  व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नांदेड दक्षीणचे लोकप्रिय आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले तर पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच प्रतीनिधी ॲड.हनमंत मुलुकपाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
व तद्नंतर त्रीशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड दक्षीणचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी सनदी अधिकारी तथा जिल्हा नियोजन समीती सदस्य अनिल मोरे, माजी जि.प. सदस्य तथा पं.स.सदस्य श्रीनिवास मोरे,लोहा न.प.माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रतीनिधी डाॅ.कालीदास मोरे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे,प्रकाश मोरे ,बंडु मोरे,कैलास मोरे,गणेश सुर्यवंशी,पत्रकार बाळासाहेब बुध्दे,शिवसांब कदम,लिंगोजी शिंदे हरबळकर,माजी सैनिक व्यंकटराव घोडके, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमण दत्ता दिघे, तंटामुक्ती अध्यक्ष आशोक मोरे,  दिगांबर किरवले, लक्ष्मणराव मोरे, रवि किरवले,माजी उपसरपंच गंगाधर दिघे, माजी उपसरपंच बालासाहेब देशमुख, सामाजीक कार्यकर्ते सुधाकर किरवले,शिवसेना तालुका उपप्रमुख शेषराव दिघे, शाळा व्यवस्थापन समीती माजी अध्यक्ष आंगद मोरे, व्यंकटराव मोरे,सामाजिक कार्यकर्ते कपिल किरवले,शाळा व्यवस्थापन समीतीचे उपाध्यक्ष चांदु किरवले,काॅंग्रेस कार्यकर्ते रामेश्वर मोरे,नारायण किरवले मुकदम,पंढरी किरवले, शंकर पुट्टेवाड मामा आदी प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थीत  होती.सुरूवातीला मान्यवरांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडर यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे आमदार मोहन आण्णा हंबर्डे,माजी सनदी अधिकारी तथा जिल्हा नियोजन समीती सदस्य अनिल मोरे, माजी जि.प.सदस्य श्रीनिवास मोरे,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,डाॅ. कालीदास मोरे या मान्यवरांची भाषणे झाली.यावेळी सविस्तर मार्गदर्शन करताना नांदेड दक्षिणचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी कारेगाव येथील नालंदा बौध्द विहाराच्या सांस्कृतीक सभागृहाच्या बांधकामासाठी स्थानिक आमदार निधीमधुन दहा लक्ष रुपये निधी देणार आसल्याची घोषणा केली.या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक नालंदा बौध्द विहार समीती अध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी संयोजक समीती अध्यक्ष तथा जे.जे.हाॅस्पीटल मुंबई येथील वैद्यकीय सेवेतील सामाजीक कार्यकर्ते गुलाब हंकारे, उपाध्यक्ष आशोक कदम,सचिव प्रदीप हंकारे,जयराज तिगोटे,कोषाध्यक्ष विकास हंकारे,सहसचिव सचिन गायकवाड,सदस्य दलीत गायकवाड,प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष राहुल हंकारे,विजय गायकवाड,देवानंद हंकारे,गोपिनाथ गायकवाड,मारोती वाघमारे,विशाल हंकारे,दिलीप कदम,नारायण गायकवाड,आकाश गायकवाड,आदींनी परिश्रम घेतले.व सायंकाळी खिरदान करून कार्यक्रमाची सांगता झाली.